आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद:नोबेल विजेते शास्त्रज्ञ सर रिचर्ड यांचा आज संवाद

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नोबेल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जे. रॉबर्ट‌्स हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांना संशोधनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी खास विद्यापीठास भेट देणार आहे. ते माॅडर्न व फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्याशीही संवाद साधतील.

या दरम्यान राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा व राष्ट्रीय कोषिका विज्ञान केंद्र येथील संशोधकांना ते मार्गदर्शन करतील. बुधवारी (दि. २) सकाळी ११.४५ वाजता राष्ट्रीय कोषिका विज्ञान केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर येथे “The Path to Nobel Prize’ या विषयावर त्यांचे व्याख्यान हाेणार आहे. त्यांचे प्रसारण विद्यापीठाच्या वेबसाइट https://webcast.unipune.ac.in वर केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...