आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस आयुक्तांची ग्वाही:नाशिक एमआयडीसीतील तंटे सोडविण्यासाठी नोडल अधिकारी, पोलिस ठाण्यासाठीही पाठपुरावा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योजक नंदकुमार आहेर यांच्या हत्येनंतर संतप्त झालेल्या उद्योजकांच्या मागण्या मान्य करून पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिलासा दिला आहे. सातपूर आणि अंबड औद्याेगिक वसाहतींचे विभाजन करून नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे, त्याचा पाठपूरावा करून या ठाण्याला औद्याेगिक वसाहत असे नाव देण्यात येईल अशी ग्वाही नाईकनवरे यांनी आज उद्योजकांना दिली.

नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

उद्योजक आहेर यांच्या हत्येनंतर पोलिस विभागही अलर्ट झाला आहे. महत्वाचे म्हणजे, सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील तंटे सोडविण्यासाठी सहाय्यक पोलिस आयुक्त सोहेल शेख यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवित असल्याचे पाेलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी जाहीर केले.

टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची ग्वाही

अंबड औद्याेगिक वसाहतीतील बंद पोलिस चौकी पुन्हा सुरू करण्याचा तसेच टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची कारवाई पाेलिस सुरू करतील, अशी ग्वाही त्यांनी उद्योजकांना दिली. उद्योजक नंदकुमार आहेर यांच्या निर्घृण हत्येचा उद्योजक तसेच व्यापारी संघटनांनी आयमाच्या सभागृहात आयोजित बैठकीत पोलिस आयुक्त बोलत होते.

व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाल, बीओटी चेअरमन धनंजय बेळे, चेंबरचे संजय सोनवणे, एमएसएमई बाेर्डचे सदस्य प्रदीप पेशकार, नाईसचे उपाध्यक्ष रमेश वैश्य, लघुउद्योग भारतीचे सचिव निखिल तापडिया, निवेकचे माजी अध्यक्ष संदीप सोनार, उद्योग आघाडीचे अध्यक्ष सतीश कोठारी, सीसीआयचे माजी अध्यक्ष सुधीर मुतालिक आदी हाेते.

या बैठकीत उद्याेजकांनी नंदकुमार आहेर यांच्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करा, यासाठी उद्योजकांनी सामूहिकरित्या अर्ज करावेत, नाशिकमध्ये गुंतवणूक यावी यासाठी औद्योगिक संघटना प्रयत्नशील असतांना अशा घटनांनी त्याला डाग लागत असेल तर ते योग्य नाही.

उद्योजकांनी आपली एकजूट दाखवून द्यावी. या भागासाठी मंजूर असलेले पोलिस स्टेशन औद्योगिक वसाहतीत उभारावे, सिमेन्स ते घरकुल योजना या परिसरात होत असलेला टवाळखोरांचा उपद्रव थांबविण्यास पोलिसांनी पावले उचलावीत, अशा मागण्या यावेळी संतप्त उद्याेजकांनी केल्या. मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन झाले पाहिजे यासाठी सह्यांची मोहीम राबवावी तसेच अंबड लगतच्या विशिष्ट भागात पेट्रोलिंग वाढवणे व बीट मार्शल वाढवण्याच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...