आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विनाहेल्मेट चालकांना फलकांद्वारे चपराक ; वाहतूक विभाग करणार उपरोधिक संदेशातून प्रबोधन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनाहेल्मेट दुचाकीचालकांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने शहर व परिसरात हेल्मेटचा वापर वाढला आहे. तरीही काही ठिकाणी विनाहेल्मेट चालक दिसून येत असल्याने वाहतूक शाखेकडून आता विनाहेल्मेट चालकांना उपरोधिकपणाने फलकाद्वारे जनजागृती केली जात आहे. विनाहेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाई सुरूच राहणार असून विनाहेल्मेट चालकांना आता या उपरोधिक सल्ल्यांनादेखील सामोरे जावे लागणार आहे. शहरात या आशयाचे फलक झळकत आहेत.

पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्टपासून ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ ही मोहीम सुरू झाली. या कारवाईने हेल्मेट वापरणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली. दुसऱ्या टप्प्यात विनाहेल्मेट चालकांचे दोन तासांचे प्रबोधन करण्यात आले. सर्व शासकीय, निमशासकीय, शाळा, महाविद्यालय आणि औद्योगिक वसाहतीमध्ये हेल्मेटसक्ती करण्यात आली. मालमत्ता अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करत आदेशाचे पालन न करणाऱ्या मालमत्ता अधिकाऱ्यांवर कारवाई केली गेली. यात प्राचार्यांसह शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई केली गेली. या कारवाईचा धसका घेत हेल्मेटचा वापर वाढला. मात्र, जे चालक हेल्मेट वापरत नाही अशा चालकांवर आता दंडात्मक कारवाईसह त्यांना सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्सद्वारे उपरोधिक संदेश देण्यात येणार आहेत. ही शहरातील पहिलीच कारवाई ठरली आहे.

उपरोधिक फ्लेक्स
‘हा आत्महत्या करायला निघालेला आहे’, ‘स्वत:ला सुरक्षित ठेवून बायकोची हत्या करायला निघालेला आहे’, ‘हा पप्पा नाही मुलीचा हत्यारा आहे’, ‘हम तो डुबेंगे, सनम तुमको भी ले डुबेंगे’, अशा आशयाचे फ्लेक्स सिग्नल परिसरात लावण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...