आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षाच्या सुरुवातीला नाशिकमध्ये तापमान घसरले:उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यातील काही भागात 3 अंश सेल्सीअसने घट

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्थानकडुन आलेल्या पश्चिमी चक्रावातामुळे उत्तर भारतात किमान तापमानात घसरण झाल्याने हिमवृष्टीसह काही ठिकाणी पाऊस होत आहे. त्यामुळे काश्मिर, लडाख, हिमाचल, उत्तराखंड भागात थंडीचा कडाका वाढला आहे.

लेह येथे किमान तापमानात घसरण होवून वजा 6.2 अंश सेल्सीअसची नोंद झाली होती. तर श्रीनगर येथे 2.8,पहलगाम 2.2 इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे, तर हिमाचल, उत्तराखंड या ठिकाणी हिमवृष्टी होत असल्याने या भागात थंडीच्या कडाक्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, महाबळेश्वर येथे किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सीअसने घसरण झाली होती. रविवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे निचाकी 7.8 अंश सेल्सीअसची नोंद करण्यात आली आहे.

पश्चिम चक्रावातामुळे उत्तर भारतील श्रीनगर, जम्मु, बनीहाल, कुर्फी, सिमला परिसरात ढगाळ वातावरण असल्याने या ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर लेह, कारगील, पहलगाम, बालटाण, गुलमर्ग, सोनमर्ग या ठिकाणी हिमवृष्टी होत असल्याने थंडीचा कडाका आहे. त्यामुळे उत्तरेकडुन वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

तसेच हे वातावरण आगमी 6 जानेवारीपर्यंत रहाण्याची शक्यता असल्याने उत्तर महाराष्ट्रासह उवर्रित राज्यात शीतलहर रहाणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला.वर्षाअखेरीला म्हणजे 31 डिसेंबर रोजी थंडीचे प्रमाण कमी जाणवत होते, मात्र नवीन वर्षाच्या प्रारंभालाच किमान तापमानात घसरण झाल्याने पहाटेपासुन थंडीचा कडाका वाढला होता, रविवारी वातावरणात दुपारपर्यंत गारवा असल्याने नागरिकांनी उबदार कपडे परिधान करावे लागत होते. परंतू थंडीचा हंगाम हा गहु, हरभरा या पिकांसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. परंतू थंडीमुळे द्राक्ष पीकांत साखर उतरण्यासाठी विलंब होत असल्याने संजीवके वापरावे लागत आहे.

तसेच किमान तापमानात घसरण झाल्यास द्राक्ष उत्पादकांना बागेत मोकळे पाणी भरावे लागणार असुन तसेच काही ठिकाणी शेकोट्या पेटवून बागेमध्ये उबदार वातावरण ठेवावे लागते. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये थंडीमुळे चिंता वाढली आहे.

असे होते राज्यातील किमान तापमान

निफाड 7.8, धुळे 9.6, नाशिक 10.0, औरंगाबाद 10.7, जळगाव 11.0, पुणे 12.5, गडचिरोली 13.4, बारामती 13.8, महाबळेश्वर 13.9, गोंदिया 14.5, सातारा 14.9, माथेरान 15.2,

बातम्या आणखी आहेत...