आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:सातबाऱ्यावर नाव नसल्याने ना. तहसीलदारास मारहाण

सुरगाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमिनीच्या सातबाऱ्यावर इतरांची नावे कशी आली, त्यात माझे नाव का नाही असा जाब विचारत एकाने येथील नायब तहसीलदारांची कॉलर पकडून गालात चापट मारल्याने या व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तालुक्यातील हट्टी येथील भारत गुलाब पवार हा अन्य दोन जणांसोबत मंगळवारी दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास तहसील कार्यालयात आला होता. नायब तहसीलदार राजेंद्र मोरे (५५) यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास निवडणूक शाखेत बसून कामकाज करत होते. यावेळी पवार याने हट्टी शिवारातील गट नं. ५० चा उतारा मोरे यांना दाखविला. त्यावर माझे नाव का कमी केले. उताऱ्यात इतरांची नावे कशी आली, असे प्रश्न विचारले. त्यावर उताऱ्यात तुझ्या वडिलांचे नाव असून त्यांच्या पश्चात तुझे नाव लागेल. त्यासाठी लेखी अर्ज कर असे सांगितले. त्यावेळी पवारला राग आल्याने त्याने मोरे यांना मारहाण केली.

बातम्या आणखी आहेत...