आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागरिकांचे सांडपाणी कचरा यामुळे गोदावरी नदीची प्रमुख उपनदी असलेल्या नंदिनी नदीला मोठ्या प्रमाणात प्रदूषणाशी सामना करावा लागत आहे. या प्रदूषणामुळेच नदीला नासर्डी नाल्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर झाल्याने नंदिनी नदीला प्रदूषणमुक्त करण्याची मागणी निसर्गसेवक युवामचकडून मुख्यमंत्र्यांकडे इ-मेलद्वारे करण्यात आली.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर पर्यावरण विभागाच्या कक्षाधिकाऱ्यांनी तातडीने नाशिकच्या मनपा आयुक्तांना याबाबत कार्यवाही करण्याची सूचना दिली हाेती. तरीही परिस्थिती जैसे थे असल्याचे निसर्गसेवक युवा मंचने या इ-मेलमध्ये म्हटले आहे.
नंदिनी नदीच्या प्रदूषण,संवर्धन तसेच सुशोभीकरण संबधीत विषयावर अनेक वर्षांपासून निसर्गसेवक युवा मंच कार्य करत आहे त्यांनी नंदिनी नदी वरील पुलांवर संरक्षक जाळ्या व नंदिनी नदी सवर्धन आणि प्रदुषण मुक्त करुण सुशोभिकरण करण्यासाठी गेल्या ५ वर्षापासून तत्कालीन गोदा सवर्धन कक्ष प्रमुख व सध्याचे शहर अभियंता नितिन वंजारी यांच्याकडे निवेदन दिले होते.
त्याविषयी सतातत्याने पाठपुरावा करत आहे. पण त्यांच्याकडून नेहमी फक्त आश्वासन मिळत असल्याचे चित्र आहे. याठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्यासाठी पालिकेकडे निधी नसल्याचे निसर्गसेवक युवा मंचचे संस्थापक अमित कुलकर्णी यांना बैठकीत सांगितले होते. यानंतर ततकालिन मंत्र्यांना पत्रव्यवहार केलाहिता.मात्र,परिस्थिती आजही तशीच असल्याचे चित्र असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.