आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तक प्रकाशन:निवडक लेखकांच्या पुस्तकांची दखल : ‘चिंतनाच्या तळाशी’

नाशिक7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेदखल असलेल्या निवडक लेखकांच्या पुस्तकांची ‘चिंतनाच्या तळाशी’ या पुस्तकात दखल घेतलेला असल्याचा संवाद लेखक, कवी गंगाधर अहिरे यांनी साधला. त्यांच्या ‘चिंतनाच्या तळाशी’ या पुस्तकाचे प्रकाशन जेलरोड येथील आंबेडकर भवन येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

चिंतनाच्या तळाळी या समीक्षापर लेखसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लेखक देवेंद्र उबाळे तर प्रा. जयश्री बागूल, गोपीचंद पगारे, रोहित गांगुर्डे, कवी प्रदीप जाधव, प्रमिला मोकळ उपस्थि होते. यावेळी उबाळे म्हणाले की, साहित्यकृतीतील उणिवांवर बोट न ठेवता, नवलेखकांना लेखन करण्यास बळ प्राप्त होईल या हेतूने निवडक पुस्तकांना प्रस्तावना व परिचयात्मक परिक्षणे लिहिलेली आहेत. तर प्रथितयश लेखकांचे वैचारिक ग्रंथ, नाटक आणि काव्यसंग्रहावर समाजशास्त्रीय समीक्षा दृष्टीकोनातून आहिरे यांनी यथायोग्य निरुपण केल्याचेही उबाळे यांनी नोंदविले. आहिरे म्हणाले की, नावाजलेले निवडक समीक्षक नवलेखकांना त्यांच्या पुस्तकांची दखल घेऊन प्रोत्साहन देतात.

पण, बहुतांश लेखकांच्या साहित्यकृती साहित्य व्यवहारातच उपेक्षित राहतात. अशा बेदखल असलेल्या निवडक लेखकांच्या पुस्तकांची मी या पुस्तकातून दखल घेतली आहे. यावेळी बुद्धभुषण साळवे आणि प्रतिभा अहिरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. करुणासागर पगारे, राजाराम अहिरे, अमोल बागूल, भाऊसाहेब मोकळ, संतोष जोपुळकर, नंदकिशोर साळवे, अॅड. अशोक बनसोड यांची विशेष उपस्थिती होती. प्रास्ताविक जयंत बोढारे यांनी केले. सूत्रसंचालन वैशाली रणदिवे यांनी केले तर प्राचार्य दिनकर पवार यांनी आभार मानले. डॉ. धीरज झाल्टे, आर. के. जाधव, राजेंद्र चंद्रमोरे, सुनील बर्वे, कुणाल शेजवळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

बातम्या आणखी आहेत...