आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खबरदारी:100 मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस, काहींना शहर सोडण्याच्याही सूचना; शहरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात, सध्या वेशात वाढवली गस्त

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोंग्याच्या मुद्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मेचा अल्टीमेटम दिल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरातील सुमारे १०० मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना १४९ च्या नोटिसा देण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत १३ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनसे पदाधिकाऱ्यांचा शोध सुरू होता.

पोलिस आयुक्तांनी बैठक घेत कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा केली. मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घरी पोलिसांनी नोटीस बाजवली. पोलिसांकडून साध्या वेशात नजर ठेवली जात आहे. ४ मे च्या पार्श्वभूमीवर या बंदोबस्तात वाढ केल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

मनसे पदाधिकाऱ्यांवर वॉच : मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर साध्या वेशातील पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या घराजबळ पोलिसांची गस्त वाढवण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...