आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष शिबिरासाठी ३५ हजार ७५० विद्यार्थीसंख्या मंजूर:पुणे विद्यापीठात आता रासेेयाेच्या ७१ हजार स्वयंसेवकांना मान्यता

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत नियमित उपक्रम व विशेष शिबिरांसाठी विद्यापीठ तथा शैक्षणिक संस्थांसाठी दरवर्षी केंद्र सरकारतर्फे विद्यार्थी संख्या मंजूर करण्यात येते. या योजनेत राज्यासाठी यंदा नियमित उपक्रमासाठी तीन लाख ५६ हजार ८०० विद्यार्थ्यांची संख्या मंजूर झाली आहे. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत अनुदानितसाठी ५२ हजार ५०० तर स्वयंनिर्वाहित म्हणून १९ हजार ५०० असे एकूण ७१ हजार ५०० विद्यार्थीसंख्या मंजूर करण्यात आली आहे.

रासेयो ग्रामीण भागाला वरदान ठरत असून, स्वयंसेवकांकडून विविध विषयांवर जनजागृती, श्रमदानातून ग्रामीण विकास साधला जातो.देशातील विद्यार्थ्यांची संख्या ३९ लाख झाली आहे. त्यात राज्यातील विद्यार्थीसंख्येत ३० हजाराने वाढ झाली. रासेयो योजनेंतर्गत ग्रामस्वच्छता, लहान बंधारे, वृक्षारोपण, व्यसनमुक्तीसह विविध विषयांवर जनजागृती, तज्ज्ञांची व्याख्याने आदी उपक्रम हाेतात.

३० सप्टेंबर माहिती सादर करण्याची मुदत
मंजूर विद्यार्थीसंख्येपेक्षा जास्त विद्यार्थी घेता येणार नाही. विद्यार्थी संख्येचे वाटप महाविद्यालयांमध्येच करावयाचे असून, वाटप केलेल्या विद्यार्थी संख्येसह महाविद्यालयांची माहिती असलेली प्रत शासनाला ३० सप्टेंबरपर्यंत द्यावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...