आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. अशातच मुंबई, पुणे, ठाणे, रायगड येथे रुग्ण संख्या वाढू लागली आहे. नाशिक जिल्हयातही रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ज्यांचे लसीकरण झाले नसेल अशांचेही लसीकरण करुन घेण्यासाठी आरोग्य प्रशासन कामाला लागली आहे.
जिल्हाधिकारी घेणार दखल
या संदर्भात आरोग्य विभाग मंगळवारी 7 जून रोजी बैठक घेणार असून, नागरिकांनीही यात स्वत: पुढे येऊन लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे. या अंतर्गत ‘हर घर दस्तक’ हे अभियान राबवत घराघरात जाऊन लसीकरणाची माहीती घेणार आहोत.
नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन
कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये नाशिक जिल्ह्यात विलंबाने दाखल झालेल्या कोरोना संसर्गाने चांगलीच उसळी घेतली होती. पण प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनाने त्यावर मात करणे शक्य झाले. आता पुन्हा राज्यात संसर्गाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना करत काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
आजच्या स्थितीत जिल्ह्यातील 74.58 टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहे. तर 89 टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. म्हणजे पहिला डोस घेतलेले 14 टक्के लोक हे दुसऱ्या डोससाठी पात्र झाले असतानाही त्यांचे लसीकरण झालेले नाही. याच लोकांचे आता लसीकरण करण्यासाठी प्रशासन सूक्ष्म नियोजन करत आहेत. आरोग्य विभागाची त्यासाठी स्वंतत्र बैठक मंगळवारी (ता.7) घेणार आहोत. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे लसीकरण केले जाणार आहे. तसेच प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचे लसीकरण करुन घेण्यासाठी विशेष भर दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले.
मनपा क्षेत्रात चिंता
लसीकरणाच्या टक्केवारी नाशिक शहर आणि मालेगाव शहराचे प्रमाण तुलनेने कमी आहे. या क्षेत्रात लसीकरण करुन घेण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असून त्यादृष्टीने मनपा अधिकाऱ्यांना बैठक घेऊन सूचित केले जाणार आहे. शहरी भागावर लक्ष केंद्रीत करणार आहोत.
मालेगाव चिंताजनक: 24.78 टक्के लोकांनीच घेतला दुसरा डोस
नाशिक ग्रामीण 91,97, 82,47
नाशिकक मनपा 92,04, 74,53
मालेगाव मनपा 60,.80, 24,78
एकूण 89,00, 74,85
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.