आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडथळा:आता रिक्षा, फेरीवाल्यांमुळे काेंडला नाशिकराेड बसस्थानकाचा श्वास

नाशिकरोडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी नाशिकराेड रेल्वे स्थानकाबाहेरील बसस्थानकालगतच्या टपऱ्यांचे अतिक्रमण काढून बसस्थानक माेकळे करण्यात आले. त्यामुळे बसेस वळवितानाची अडचण दूर झाली. आता मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. या बसस्थानकालगत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याभोवती चारचाकी वाहने, रिक्षा, फळविक्रेते, खासगी वाहने, खाद्यपदार्थांच्या गाड्या यांचा दिवसभर गराडा असल्याने रेल्वेस्थानकातून प्रवाशांना बाहेर पडणेही गैरसोयीचे होते. परिसरातील व्यावसायिक तसेच नियमित प्रवाशांनी यासंदर्भात महापालिका तसेच वाहतूक पाेलिसांकडे तक्रार करूनही या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त भावना उमटत आहेत.

नाशिकरोड बसस्थानकातूून सिन्नर, कोपरगाव, अहमदनगर, संगमनेर, पुणे या शहरांसह २०० हून अधिक सिटीलिंक बसेसच्या फेऱ्या दिवसभरात होतात. तर नाशिकरोड रेल्वेस्थानकात दिवसभर ९० प्रवासी रेल्वे ये-जा करत असल्याचे रेल्वे प्रशासन सांगते. मात्र पूर्णत: व्यावसायिक झालेल्या रेल्वे प्रशासनाने प्रवेशद्वारासमोरच पार्किंगचा ठेका दिल्याने तेथेच वाहनांची गर्दी होते. तर हा भाग टॅक्सी आणि रिक्षांमुळे पूर्णत: बंदीस्त झाला आहे. या परिसरात पोलिस चौकीसमोरच फळविक्रेत्यांचे गाडे लागत असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहे. प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षाही येथे अस्ताव्यस्त फिरत असतात. या सगळ्या प्रकारामुळे येथून बस वळविणेही जिकिरीचे झाले असल्याचे सिटीलिंक बसचे वाहक सांगतात.

२ दिवसांत अतिक्रमण मोहीम
नाशिकरोड विभागात ठिकठिकाणी अतिक्रमण झाल्याचे दिसून आले आहे. संबंधित अतिक्रमण मोहिमेला सुरुवात झाली असून येत्या दोन दिवसांत कडक कारवाई करण्यात येणार आहे. - सुनील आव्हाड, विभागीय अधिकारी नाशिकरोड

बातम्या आणखी आहेत...