आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा:अल्पवयीन मुलींचे विवस्त्र फोटो पॉर्न साइटवर अपलोड; आरोपीला साडेतीन वर्षे सक्तमजुरी, ३ लाखांचा दंड

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलींशी मैत्री करून त्यांना घरी बोलावत त्यांचे विवस्त्र फोटो मोबाइलमध्ये काढून पॉर्न फिल्म साइटवर व्हायरल करणाऱ्या आरोपीला ३ वर्षे ६ महिने सक्तमजुरी आणि तीन लाखांचा दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. शुक्रवारी (दि. ६) मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. एल. भोसले यांनी ही शिक्षा सुनावली. अक्षय श्रीपाद राव (२८, रा. शिवायतन बंगला, खोडेनगर, इंदिरानगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पाच जिल्ह्यांत सायबर गुन्ह्यात ही पहिलीच शिक्षा ठरली आहे. अभियोग कक्षाने दिलेली माहिती अशी, जुलै २०१६ ते १२ जून २०१७ या कालावधीत आरोपी अक्षय रावने त्याच्या ओळखीच्या दोन अल्पवयीन मुलींशी मैत्री केली. त्यांना घरी बोलावून लपून त्यांचे विवस्त्र फोटो व व्हिडिओ मोबाइलवर काढले. फोटो आणि व्हिडिओ पॉर्न साइटवर अपलोड करत ते सोशल मीडियावर व्हायरल केले.

याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन निरीक्षक अनिल पवार यांनी गुन्ह्याचा तपास केला. आरोपीविरोधात सबळ पुरावे गोळा केले गुन्हा सिद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. एल. भोसले यांनी तक्रारदार, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकारी यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीला ३ वर्षे ६ महिने सक्तमजुरी आणि तीन लाख दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाकडून अॅड. सुधीर सपकाळे यांनी कामकाज पाहिले. पैरवी आर. ए. खकाळे, जी. ए. गायकवाड यांनी पाठपुरावा केला.

बातम्या आणखी आहेत...