आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकौशल्य विकास आणि रोजगार विभागाच्या वतीने राज्यभरात रोजगार मेळाव्यांद्वारे बेरोजगारांच्या हाताला काम दिले जात असून, एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान नाशिक विभागामध्ये तब्बल ३३ मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ११ हजार ६८३ बेरोजगारांची नोंदणी झाली आहे. परंतु हाती काम अवघ्या ३ हजार ५७ उमेदवारांनाच मिळाले आहे. विशेष म्हणजे या आकड्यांमध्ये पुणे विभागात सर्वात पुढे १२ हजार ६२२ बेरोजगारांना नोकरी मिळाली आहे. नागपूर विभाग तळाला असून अवघ्या ३१ जणांच्या हाताला काम देण्यात कौशल्य विकासला यश आले आहे.
राज्य सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या नियमित रोजगार मेळावे आयोजित केले जात आहे. त्यासाठी ‘महास्वयम’ पोर्टलवर रोजगारासाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रकल्प राज्याबाहेर; बेराेजगारीचा प्रश्न गंभीर
रोजगार प्रश्नाने राज्यात विक्राळ रूप धारण केले असताना महाराष्ट्रात येणारेे अनेक उद्योग इतर राज्यांमध्ये गेले. त्यामुळे बेरोजगारीचा हा प्रश्न अधिक ऐरणीवर आला. एकामागून एक तीन ते चार उद्याेग महाराष्ट्राबाहेर गेल्याने किमान १५ हजारांहून अधिक तरुणांच्या रिकाम्या हातांना काम मिळाले नाही. त्यामुळे बेराेजगारांचा आकडा वाढलेला आहे. त्यावर तात्पुरता इलाज म्हणून राज्य शासनाने भरती प्रक्रिया सुरू केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.