आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Nupur Sharma Statment Mohammed Paigamber | File A Case Against BJP Spokesperson Nupur Sharma; Demand Of Muslim Reservation Struggle Committee

पैगंबरावर आक्षेपार्ह वक्तव्य:भाजप प्रवक्ता नुपुर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करा; मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीची मागणी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नुपुर शर्मा यांनी केलेल्या विधानावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांनी भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांच्याकडे एक निवेदन देण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे की, पवित्र इस्लाम धर्मात सर्वात जास्त महत्व, मान सन्मान व प्रेम हे अंतिम प्रेषित मोहम्मद पैगंबर यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच त्यांच्या पत्नी हजरत आयेशा सिद्दिकी यांना संपूर्ण मुस्लिम धर्मीय आपल्या आईपेक्षा जास्त मान सन्मान देतात. दि. 28 मे रोजी टाईम्स नाऊ या इंग्रजी चॅनेलवर ज्ञानवापी फाईल या चर्चेच्या कार्यक्रमात नवी दिल्ली येथील भाजप प्रवक्ता नुपुर शर्मा या महिलेने चर्चेदरम्यान अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन अंतिम प्रेषित व त्यांच्या पत्नी यांच्याविषयी बदनामीकारक व खोटे विधान करुन त्यांच्या पवित्र व आदर्श चारित्र्यावर शिंतोडे उडवत सर्व मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून त्यांच्या या विधानामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुपुर शर्मा यांच्याविरुद्ध भा.द.वि.कलम 295 (अ),153 (अ),505 (2) अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई असे निवेदनात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...