आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये एकतर्फी प्रेमातून छेडछाड:नर्सचा विनयभंग करत तिच्या भावालाही मारहाण, पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये खासगी रुग्णालयाच्या परिचारिकेचा रस्ता अडवून तिचा विनयभंग करण्यात आला. भर रस्तात तिचा हात पकडत तू माझी झाली नाहीस, तर कोणाचीही होणार नाहीस म्हणत पीडितेच्या मामे भावालाही मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून संशयात आरोपीचा शोध सुरू आहे.

नेमके प्रकरण काय?

पेठरोड येथील एका खासगी रुग्णालयासमोर पीडितेला एकाने थांबवले आणि मला तू आवडतेस असे म्हणत तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. भेदरलेल्या परिचारिकेने भीतीपोटी हा प्रकार घरी कुणास सांगितला नाही. मात्र, समवयीन मामे भावाला या प्रकरणी तिने सांगितले. दुसऱ्या दिवशी त्याने पाटलाग करणाऱ्या तरुणाला जाब विचारला तर संशयिताने त्याला बेदम मारहाण केली. यावेळी तू माझी नाही झालीस, तर कोणाचीही होऊ देणार नाही अशी धमकी पीडितेला दिली. यामुळे शुक्रवार दि. 10 रोजी संशयित सुनिल जाधव याच्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचा तपास सुरू

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, पेठरोड परिसरातील एका खासगी रुग्णालयात नर्स आहे. रुग्णालयाचे काम संपल्यावर घरी जात असताना घरा समोरील राहणारा संशयित सुनील जाधव हा पाठीमागून आला. हात पकडून तू मला खूप आवडते. माझाशी प्रेम संबंध ठेव, असे सांगितले. या प्रकाराने युवतीला प्रचंड धक्का बसला होता. पीडित तरुणीने घरी हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...