आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य सेवा:परिचारिका या देशातील आरोग्य सेवेचा प्रमुख कणा : डॉ. थोरात

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिचारिका या आरोग्यसेवेचा कणा असून त्यांचे काम दुर्लक्षित राहते. तरी देखील कुठल्याही कौतुकाची अपेक्षा न ठेवता त्या फक्त रुग्णसेवेला महत्व देत आहे. त्यांचा सत्कार करणे हे माझे भाग्य असल्याचे गौरवोदगार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात यांनी काढले. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देत रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिका आणि वार्ड इन्चार्ज सिस्टिर यांचा जिल्हा नर्सेस असोसिएशन आणि गौरी सामाजिक संस्थेच्या वतीने प्रशस्तीपत्रक देत सन्मान करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात. अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांच्या हस्ते प्रशिस्ती पत्रक देत गौरव करण्यात आला. अपघात विभागाच्या वैशाली पराते, इमर्जन्सि वार्डच्या एम.व्ही. जाधव, शस्त्रक्रिया विभागाच्या लता परदेशी, इनफेक्शन वार्डच्या राबिया पठाण, बर्न वार्डच्या लता गोसावी, यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी असोसिएशनच्या अध्यक्षा पुजा पवार, सरचिटणीस कल्पना पवार, अधिसेविका शुंभागी वाघ, गौरी सामाजिक संस्थेच्या रोहिनी नायडू अदी उपस्थित होते. डॉ. किशोर श्रीवास यांनी आरोग्य सेवेत असताना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे सहकार्य गरजेचे असल्याचे सांगून प्रत्येक डॉक्टर रूग्णाला योग्या ती सुविधा देण्याचाच प्रयत्न करीत असतो, असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...