आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरा कायम:नर्सिंग काॅलेजचा निकाल 100 टक्के‎

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎जिल्हा रुग्णालयातील शासकीय‎ परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाने‎ आपली १०० टक्के निकालाची‎ परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी‎ वाढीव प्रवेश क्ष मतेने एएनएम ४०‎ जागा व जीएनएम ४० जागांसाठी‎ प्रवेश झाले असून जिल्हा‎ शल्यचिकित्सक व अधिसेविका‎ यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण‎ परिचर्या शिक्षणाचे काम सुरू‎ असल्याचे प्राचार्य सागर अस्मर‎ यांनी सांगितले.‎ नुकत्याच जाहीर झालेला तृतीय‎ वर्षाच्या निकालात जागृती शर्मा‎ प्रथम, माधुरी कडवे द्वितीय तर संध्या‎ पल्हाळ यांनी तृतीय क्रमांक प्राप्त‎ केला.

या महाविद्यालयात एएनएम‎ हा दाेन वर्षांचा तर जीएनएम हा तीन‎ वर्षाच्या अभ्यासक्रमासाेबतच‎ एलएचव्ही म्हणजेच स्त्री स्वास्थ्य‎ अभ्यंगता हा अभ्यासक्रमही येथे‎ शिकविला जाताे. याच‎ महाविद्यालयात ठाणे येतील ११‎ विद्यार्थीदेखील जीएनएम प्रशिक्षण‎ घेत हाेते. या ११ विद्यार्थ्यांमधून‎ दामिनी भाेये या विद्यार्थिनीने प्रथम‎ क्रमांक पटकावला. येथे बीएस्सी‎ नर्सिंग अभ्यासक्रम सुरू हाेण्यासाठी‎ सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे.‎ त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक‎ डाॅ. अशाेक थाेरात, अधिसेविका‎ शुभांगी वाघ प्रयत्न करत असल्याचे‎ प्राचार्य सागर अस्मर यांनी‎ सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...