आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आरोग्यसेवेत परिचारिका हा महत्त्वपूर्ण घटक : डॉ. थोरात, जिल्हा शासकीय रुग्णालयातील कार्यक्रमात रुग्णसेवा बजावणाऱ्या परिचारिकांचा सत्कार

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य सेवेच परिचारिका हा महत्त्वाचा घटक आहे. त्या आरोग्यसेवेचा कणा असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले. जागतिक परिचारिका दिन जिल्हा रुग्णालयात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. थोरात पुढे म्हणाले. कोरोना काळात परिचारिकांनी आपल्या कुटुंबियांपासून दूर राहून रुग्णसेवेला प्राधान्य दिले. आरोग्यसेवेसाठी परिचारिकांचे योगदान सर्वाधिक आहे. सामाजिक कल्याणकारी संस्था आणि परिचारिका असोसिएशनच्या वतीने वार्डप्रमुख इनचार्ज सिस्टर यांचा प्रतिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, अधिसेविका शुभांगी वाघ, असोसिएशनच्या पूजा पवार, सीमा टाकळकर, रोहिणी नायडू, राजश्री सुरावरकर, माधुरी नेरकर, मुक्ता दमकोंडकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी पंकज वाघ, वैशाली पराते आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...