आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाला वाचविण्यात यश:नायलॉन मांजा पक्ष्यांच्या जीवावर; एका कबुतराचा मृत्यू

सातपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर परिसरात नायलॉन मांजाला बंदी असूनही त्याचा सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे संक्रातीपूर्वीच पक्ष्यांवर संक्रांत येत असून मांजाने गळा कापल्यामुळे शांतिदूत समजल्या जाणाऱ्या कबुतराचा मृत्यू झाला. याचवेळी घडलेल्या घटनेत दुसऱ्या कबुतराला वाचविण्यात यश आले. सातपूर परिरातील थाेरात पार्क इमारतीजवळ नायलाॅन मांजात अडकल्याने दाेन कबुतरे खाली पडली हाेती. दाेन्ही कबुतरांच्या गळ्याभाेवती व पायास नायलाॅन मांजा अडकला हाेता. यात एका कबुतराचा तडफडून मृत्यू झाला तर दुसऱ्या कबुतरास वाचविण्यात यश आले.

सुभाष खैरनार व शिवा हतांगले यांनी नायलॉन मांजातून कबुतराची सुटका करत त्याच्यावर प्रथमोपचार केले. परिसरात फेकलेल्या नायलॉन मांजाच्या गुंत्याने चिमण्या, कबूतर, इतर छोटे पक्षी फसून जखमी होत असल्याचे चित्र आहे. अनेक चिमण्या, कबूतर पायात मांजा अडकलेले दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच दुचाकीवरून जात असताना प्रवीण वाघ यांची नायलॉन मांजाने मान कापल्याने आठ टाके पडले होते. संक्रांतीला एक महिना अवकाश आहे तरीही नायलॉन मांजा सहज उपलब्ध होत असून मांजाविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...