आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामानवतेची शिकवण आणि आत्मशुद्धीचे पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची सांगता होऊन मुस्लीम बांधवांनी पारंपरिक प्रथेनुसार उर्दू महिना शव्वालच्या १ तारखेला मंगळवारी (दि. ३) ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली. ईदनिमित्त सालाबादप्रमाणे ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाजपठण करण्यात आले. दरम्यान, या अल्लाह मेरे देश मे अमन कायम रख...! अशा शब्दात देशात एकता व अखंडता टिकून राहावी तसेच देशाच्या प्रगतीसाठी अमन, शांती कायम राहावी व देशाची प्रगती व्हावी, यासाठी विशेष दुआ करण्यात आली.
मंगळवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटाला हाफिज हिसामोद्दीन खतीब यांनी नमाज पठणाला प्रारंभ केला. धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित दरुदोसलामचे जनसमुदायाने पठण केले. समारोप विशेष दुवाने करण्यात आला. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी महापालिका आयुक्त रमेश पवार, तसेच पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, सुनील बागुल, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, शोभा बच्छाव, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.