आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये प्रभाग रचनेवर हरकती:प्रभाग क्रमांक 20 मधील 1 हजार मतदारांची नावे प्रभाग 17 मध्ये; माजी नगरसेवक यांची यादीवर हरकत

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका निवडणुकीसाठी 23 जूनला महापालिका प्रशासनाकडून शहरातील सर्व 44 प्रभागांची मतदार याद्या प्रसिद्ध केली आहे. प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर एक जुलैपर्यंत त्याच्यावर हरकती मागवण्यात आले आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक 20 मधील द्वारका परिसरातील सुमारे एक हजार नावे प्रभाग क्रमांक 17 मध्ये समाविष्ट झाले असून ते तिथून कमी करून प्रभाग 20 मध्ये टाकण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे मगळवारी केली.

महापालिका निवडणुकीच्या मतदार यादी प्रभाग १७ च्या विशलेषन केल्यावर प्रभाग क्र. 20मधिल क्षेत्रातील भाग नागसेन नगर, समता नगर, न्यु आग्रा रोड यादीचा भाग प्रभाग 17 मध्ये समाविष्ठ झाला आहे. हा भाग द्वारका पोलीस चौकीच्या मागे असून हे क्षेत्र पुर्णपणे प्रभाग क्र.20 मध्ये आहे. व या संपूर्ण यादीत अनु. क्र. 1716 पासून ते 2777 पर्यन्त 90 टक्के पेक्षा जास्त मतदार अनुसूचीत जातीचे आहे व त्यामुळेच प्रभाग क्र. 20 मध्ये अनुसुचित जातीचे आरक्षण पडले. यादी क्र. 128 हे प्रभाग क्र. 17 मधुन वगळून प्रभाग 20 मध्ये समाविष्ठ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रभाग 20च्या यादीत यादी क्र. 128 मध्ये अनुसुचीत जातीच्या मतदारांची संख्या कमी होईल व त्याचा परिणाम संपूर्ण अनुसुचीत आरक्षित प्रभागावर होवून मोठा कायदेशिर पेच निर्माण होईल व नाईलाजाने मला न्यायालयात दावा दाखल करावा लागेल, असा इशाराही सय्यद यांनी दिला आहे.