आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट:पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; सटाण्यात तरुणास अटक, संशयित तरुण फार्मसीचा विद्यार्थी

नाशिक, दिंडोरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या निखिल भामरे (रा. पिंगळवाडे, ता. सटाणा) या संशयिताला दिंडोरी पोलिसांनी अटक केली आहे. वरवंडी येथील एका फार्मसी महाविद्यालयात तो शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भामरे बागलाणकर नावाने सोशल मीडियावर हँडल चालवतो. त्यावर त्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जातीय तेढ निर्माण होणारी पोस्ट टाकली होती. यामध्ये शरद पवार यांच्यावर अशीच पोस्ट टाकल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. भामरेचे सोशल मीडिया खाते तात्पुरते निष्क्रिय करण्यात आले आहे. तो हँडलवरून सनातनी विचारांसह काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे वरिष्ठ नेते व मंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह व विखारी भाषेत ट्वीट करून लाइक्स व कमेंट मिळवत हाेता. सहा हजारांवर त्याचे फॉलोअर्स असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

बातम्या आणखी आहेत...