आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्माष्टमी:इस्कॉन मंदिरात १३०० पदार्थांचा नैवेद्य अर्पण

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साेहळ्यानिमित्त शुक्रवारी (दि. १९) मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांना १३०० विविध पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. जन्माष्टमीनिमित्त मंदिराची तसेच श्री राधा-कृष्णाच्या विग्रहांची सुंदर सजावट करण्यात आली होती.

श्रीकृष्णांच्या विविध लीला प्रदर्शित करणारी लघुनाट्ये तसेच दिवसभर कीर्तन, भजन मंदिरात पार पडले. मंदिरात २४ तास अखंड हरिनाम संकीर्तन झाले. सकाळी गोपाल तोषनी यज्ञ पार पडला. शुक्रवारी सांयकाळी १००० भाविकांनी श्री राधा-कृष्णाच्या विग्रहांचा पंचामृताने अभिषेक केला. रात्री १२ वाजता भगवान श्रीकृष्णांना महाआरती व महाभोग अर्पण करण्यात आला. व्रजविहारी प्रभू व नित्यानंद प्रभू जन्माष्टमीचे प्रवचन झाले. शनिवारी मंदिरात नंदाेत्सव साेहळ्यानिमित्त कीर्तन पार पडले. त्यानंतर सायंकाळी महाप्रसाद वाटप करण्यात आला. जन्माष्टमी महोत्सवाच्या यशस्वितेसाठी मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन प्रभू, उत्सव समितीप्रमुख लीलाप्रेम प्रभू व अच्युत प्राण प्रभू, अक्षय एडके यांनी विशेष प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...