आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:जुने हाॅकर्स रद्द, आता नवीन हाॅकर्स झाेन; प्रतिसाद नसल्याने आयुक्तांचे सर्वेक्षणाचे आदेश

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय फेरीवाला धाेरणाची दुसऱ्या टप्प्यात अंमलबजावणी करण्यासाठी शहरात नवीन वसाहती तसेच नागरिकांच्या मागणीनुसार नवीन हाॅकर्स झाेनची कुठे गरज आहे त्याच्या सर्वेक्षणाचे आदेश पालिका आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. यापूर्वी १२५ हाॅकर्स झाेन निश्चित केले असून ज्या हाॅकर्स झाेनमध्ये फेरीवाले स्थलांतरित हाेत नसतील, त्याची पडताळणी करून जेथे गरज नाही तेथील झाेन रद्द करावे तसेच सूचना देऊनही नाेंदणी प्रमाणपत्र न स्वीकारणाऱ्या फेरीवाल्यांची मान्यता रद्द करण्याच्या आयुक्तांनी सूचना दिल्या.

शहरात माेक्याच्या चाैकात अनधिकृतपणे फेरीवाले तसेच विक्रेते बसत असल्यामुळे अडचण हाेत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने २०१३ मध्ये राष्ट्रीय फेरीवाला धाेरणाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पालिकेने शहरात १२५ हाॅकर्स झाेन सर्वेक्षणाअंती निश्चितही केले. या हाॅकर्स झाेनमध्ये जवळपास १०६१४ फेरीवाल्यांची नाेंदणीही झाली मात्र, त्यानंतर नानाविध कारणांमुळे अनेक हाॅकर्स झाेनमध्ये फेरीवाले स्थलांतरित झालेच नाही.

त्यानंतर काेराेना व अन्य कारणांमुळे काही हाॅकर्स झाेनमधून फेरीवाले अचानक गायब झाले. काही हाॅकर्स झाेन हे गैरसाेयीचे असल्यामुळे येथे हाॅकर्स फिरकलेच नाही. यासंदर्भात आयुक्तांकडे फेरीवाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर फेरीवाला धाेरणाची दुसऱ्या टप्प्यात अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्यानुसार मिळकत विभागामार्फत शहरात नव्याने सर्वेक्षण करून नवीन हाॅकर्स झाेनची गरज काेठे आहे, यासाठी जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या.

विभागीय अधिकाऱ्यांना महिनाभराचा अल्टिमेटम
शहरात जवळपास १०६१४ हाॅकर्सची नाेंदणी असली तरी, ११२४ फेरीवाल्यांनीच नाेंदणी प्रमाणपत्र स्वीकारले आहे. ही बाब लक्षात घेत विभागीय अधिकाऱ्यांनी महिनाभरात त्यांना फेरीवाला नाेंदणी प्रमाणपत्र देण्याचा अल्टीमेटम दिला. ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नसेल, त्यांची नाेंदणी रद्द करण्याचीही तंबी दिल्याची माहिती उपायुक्त करुणा डहाळे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...