आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजेचा लपंडाव:जुने नाशिक 18 तास अंधारात

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या नाशकात गेल्या काही दिवसांपासून वीजेचा लपंडाव सुरूच असताना बुधवारी (दि. १४) अचानक आलेल्या पावसानंतर खंडीत झालेला वीजपुरवठा गुरुवारी दुपारनंतर सुरळीत झाला. यामुळे जुने नाशिक १८ तास अंधारात हाेते. जुने नाशिक भागातील दुधबाजार, मुलतानपुरा, कोकणीपुरा, चौक मंडई, सहकारनगर परिसरसह खडकाळी भागाला खंडीत वीजेचा फटका बसला.

याबाबत स्थानिक रहिवासी बाबा कोकणी व नागरिकांसह सबंधित वीज पुरवठा कार्यालयात तक्रार केली. मात्र कार्यालातून उर्मट, उद्धट उत्तरे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी पाऊस आल्यानंतरही येथे वीज पुरवठा खंडीत झाला. ताे गुरुवारी संध्याकाळी सुरळीत झाला. गंजमाळ परिसरातील केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अडचण निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र वारंवार हा बिघाड होत असल्यामुळे त्रस्त नागरिक या समस्येतून कायमची सुटका केव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...