आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील 'इपीएस ९५' पेन्शनरांचे विविध ठिकाणी राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने मेळावे आयोजित होत आहेत. आज (ता. १२) रोजी सकाळी १० वाजचा ओझर खंडेराव मदिर येथे ई.पी. एस. ९५ पेन्शनर्स मेळावा संपन्न झाला. यावेली पेन्शनर्सची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आपल्या समस्या त्या वेळा त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवल्या व EPS-95 राष्ट्रीय संघर्ष (NAC) नाशिक जिल्हा राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेृत्वाखालील देशभर दिनांक १५ मार्च रोजी ११.०० वाजता होण्या रास्ता रोको मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यरत कर्मचारी सेल चे महाराष्ट्र कार्याध्यक्ष गिरीश वलवे यांनी केले आणि रास्ता रोको कशासाठी याबाबत मागण्यांची माहीतीही दिली.
इतिहास 95 पेन्शन धारकांची केंद्र सरकार वारंवार फरपट करीत असून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्याने पेन्शन धारक अहवाल झाले आहेत राज्य व केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भरघोस पगार व निवृत्तीवेतन त्याच्या तुलनेत सामान्य कामगारांना मात्र अतिशय रकमेत उदरनिर्वाह करावा लागत आहे. तरी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
प्रमुख मागण्या
दर महा किमान रु.७,५०० पेंन्शन महागाई भत्यासह लागू करा. पती पत्नीस मोफत वैद्यकीय सुविधा द्या. सर्वोच्च न्यायालयाचे निकालानुसार भेदभाव न करता सर्वांना हायर पेन्सन व त्यासाठी भरावी लागणारी राम मिळणाचापेन्सन वाढीच्या एरीयर्स मधुन समायोजन करण्यात यावी.
या व इतर प्रमुख मागण्यांसाठी भारतातील किमान प्रमुख दोनशे ठिकाणी एकाच दिवशी रस्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे तेव्हा जास्तीत जास्त ई.पी.एस. ९५ पेन्सनर्स उपस्थिती राहून आंदोलन यशस्वी करावे ही विनंती केली ह्या मीटिंग साठी गिरीश वलवे कर्मचारी सेल महाराष्ट्र राज्य, सुरेश जाधव जिल्हाध्यक्ष नाशिक. कैलास आहेर जिल्हा उपाध्यक्ष नाशिक, अरुण शेजवळ जिल्हा सचिव नाशिक.पवन आहेर ,कैलास सातभाई मुकेश राऊत आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.