आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा14 मार्च रोजी होणाऱ्या बेमुदत संपामध्ये राज्यातील सर्व कर्मचारी संघटना सहभागी होत आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) यांनी संपात सहभागी होण्याचा निश्चय केला आहे. आज बैठकीत निर्णय घेण्यात आला.
या अनुषंगाने नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ), नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ, जिल्हा शिक्षकेतर संघटना व त्यांच्या अधिपत्याखाली येणार सर्व संघटना या बेमुदत संपात सहभागी होत असून जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी मोठ्या संख्येने या संपात सहभागी होऊन शिक्षकांची ताकद दाखवण्याचे आवाहन सर्व संघटनांचे पदाधिकारी यांनी केले आहे.
जुन्या पेन्शनच्या मागणी सोबतच मोठ्या प्रमाणावर *शिक्षकांची पदे रिक्त असून ती भरण्यात यावी. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०-२० व ३० वर्षानंतर दिली जाणारी श्रेणी लवकरात लवकर देण्यात यावी.
विनाअनुदानीत शाळेवरून अंशतः व पूर्ण अनुदानित शाळेवर शिक्षकेतर भरतीवर असलेली बंदी हटवण्यात यावी. टप्पा अनुदानावर असणाऱ्या सर्व शाळांना विनाअट पुढील टप्पा देण्यात यावा.
ह्या व इतर मागण्यांसाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संपावर यापासून जिल्हाभरातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर बंधूंनी संप यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ नाशिक जिल्हा टीडीएफ नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ नाशिक जिल्हा शिक्षकेतर संघटना नाशिक जिल्हा शिक्षक सेना नाशिक जिल्हा जुनी पेन्शन कोर कमिटी आणि संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य इस्तू संघटना, नाशिक जिल्हा कासनाशिक जिल्हा प्रयोगशाळा सहाय्यक संघटना, नाशिक जिल्हा ग्रंथपाल संघटना, तसेच सर्व समविचारी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांनी केली आहे.
संप यशस्वी करण्यासाठी रविवार दिनांक 12 मार्च 2023 रोजी सर्व संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांची सभा घेण्यात आली. वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात घेण्यात आली. या सभेला उपस्थित राहून संप यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, शिक्षक नेते बाळासाहेब सूर्यवंशी, शिवाजीराव निरगुडे, संजय चव्हाण, गोरखतात्या सोनवणे, मधुकर भदाणे आदींनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.