आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • On Behalf Of The Nashik District Legal Services Authority And The Administration, A Grand Meeting Of Government Schemes Will Be Held Today. Citizens Will Get Information About Government Schemes And Benefits

शासकीय योजनांचा महामेळावा:नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व योजनांची मिळणार माहिती, नाशिक जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

प्रतिनिधी | नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन रविवारी 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शिवाजी इंदलकर यांनी ही माहिती दिली.

महामेळाव्यात जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, टपाल विभाग, बँक अशा सर्व शासकीय कार्यालयांनी सहभाग नोंदविलेला आहे. या महामेळाव्याच्या माध्यमातून लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ दिला जाणार असून विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल देखील याठिकाणी लावण्यात येणार आहेत. या महामेळाव्यात लाभार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही सचिव इंदलकर यांनी केले आहे.

या महामेळाव्यात सर व परिसरातील नागरिकांना थेट प्रशासनाच्या शासनाच्या योजनांची माहिती देखील उपलब्ध होणार असून त्यासंबंधीची सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी आणि एकाच वेळेस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व प्रकारच्या नागरिकांना त्या मेळाव्याचा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे प्रशासनातील व न्यायालयातील सर्व प्रमुख अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी होणार असल्याने नागरिकांना इतर कामांसाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची आवश्यकता राहणार नाही.

महामेळाव्यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आाशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात आदी उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...