आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालना:पहिल्याच दिवशी देवळालीतून किसान रेलमध्ये 22 टन कृषी माल विविध राज्यांत झाला रवाना

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कमी अवधीत शेतमाल पाेहोचवणारी देशातील पहिली किसान रेल शेतकऱ्यांसाठी ठरणार महत्त्वाची

नाशिक जिल्ह्यातून देशाच्या विविध राज्यांमध्ये द्राक्ष, कांदा, भाजीपाला, डाळिंब, टोमॅटो यांना मागणी असते. हा कृषी माल कमी अवधीमध्ये सुरक्षित पोहोचावा यासाठी रेल्वे प्रशासनाने देवळाली ते दानापूर अशी किसान रेलगाडी सुरू केली. पहिल्याच दिवशी देवळाली स्थानकातून २२ टन कृषी माल रवाना करण्यात आला.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असलेल्या देवळाली ते दानापूर किसान रेलचा शुक्रवारी व्हिडिओ लिंकद्वारे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे उद्घाटन झाले.

या व्हिडिओ कॉन्फरन्स सोहळ्याला रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री छगन भुजबळ, खा. भारती पवार, खा. डॉ. नरेंद्र जाधव, आमदार सरोज आहेर हे सहभागी झाले होते. मात्र देवळाली रेल्वेस्टेशनवर उपस्थित राहूनही खासदार हेंमत गोडसे यांना तांत्रिक कारणामुळे उद््घाटन सोहळ्यास सहभागी होता आले नाही. यामागे रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आरोप करीत गोडसे यांनी नाराजी व्यक्त केली.

या वेळी रेल्वेस्थानकावर भुसावळ डिव्हिजनचे एडीआरएम मनोजकुमार सिन्हा,डीएसटीई विजय खैंची,देवळाली स्टेशन प्रबंधक एम. के. सिन्हा, राजेश फोकणे, स्थानिक शेतकरी अशोक पाळदे, कैलास गोडसे, रामदास ढोकणे, संजय गोडसे, सुरेश कदम, राकेशकुमार कुठार, आर. एस. गोसावी, कुंदन महापात्रा, प्रकाश मारसाळे, अनंत कोल्हे, अजय तिवारी, तुषार पंजाबी, राकेश पलारिया यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित हाेते.

एकीकडे आनंद होतो, तर दुसरीकडे उपस्थित होता आले नाही याची खंत : खासदार गोडसे
नाशिक जिल्ह्यातून द्राक्षे,कांदे,भाजीपाला यासह नगदी पिके कमी वेळात सुरक्षितपणे परराज्यात पोहोचणार आहेत. देवळाली ते दानापूर बिहार या देशातील पहिल्या रेल्वेमुुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.केंद्रीय कृषिमंत्री व रेल्वेमंत्री यांच्या हस्ते झेंडी दाखवण्यात आली याचा आनंद आहे, मात्र स्थानिक रेल्वे प्रशासनाने दाखवलेल्या अनास्थेमुळे उपस्थित राहूनही कार्यक्रमात सहभागी होता आले नाही याचीच खंत आहे.

बातम्या आणखी आहेत...