आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेराेनाचे सावट ओसरल्यानंतर तब्बल दाेन वर्षांनी शाळा पूर्ववत सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शासनासह विविध सामाजिक संस्थांनी शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवेशाेत्सव साजरा केला. मनसेच्या वतीने माजी नगरसेवक सलीम शेख यांनी सातपूर येथील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करतानाच त्यांना चाॅकलेटचे वाटप केले.
सातपूर काॅलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना मनाेरंजनासाठी फुगे देण्यात आले. त्याचबराेबर कॅडबरी व चाॅकलेटचे वाटप करण्यात आले. काेराेना काळात विद्यार्थ्यांचे माेठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले असून आता शिक्षकांनी जबाबदारीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढावे, अशी अपेक्षा मनसेचे नेते तथा माजी स्थायी सभापती सलीम शेख यांनी व्यक्त केली. याचबराेबर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त परिसरातील नागरीकांना 54 किलाे लाडूचे वाटप करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे किसनराव खताळे, शांताराम जमधडे, प्रकाश महाजन, शांताराम पाटील, प्रकाश घ्यार, रंगनाथ आंधळे, भगवान ठाकूर, प्रकाश काळे, शंकर पाटील, भास्कर सोनावणे, महिला विभाग अध्यक्ष आरती खिराडकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, सातपूर विभाग अध्यक्ष योगेश लभडे, सचिन सिन्हा, विजय अहिरे, ज्ञानेश्वर बगडे, मिलिंद कांबळे, विशाल भावले, श्याम गोहाड, संदेश जगताप, साेमनाथ पाटील, सचिन सांगळे, वैभव महिरे, विजय उल्हारे, कैलास जाधव आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.