आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक शहर पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकार दिनानिमित्त शुक्रवारी (दि. ६) सकाळी १०:३० वाजता मविप्र संस्थेच्या गंगापूर रोडवरील ‘केटीएचएम’ महाविद्यालयाच्या कॅम्पसमधील ‘आयएमआरटी‘ महाविद्यालयाच्या सभागृहात विविध विषयांत उल्लेखनीय लेखन केलेल्या पत्रकारांचा गाैरव करण्यात येणार आहे. उत्कृष्ट पत्रकार म्हणून दिव्य मराठीचे प्रतिनिधी सचिन जैन यांनाही गाैरविण्यात येणार आहे.
दरवर्षी दर्पणकार आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांच्या स्मरणार्थ ६ जानेवारीला माध्यमकर्मी पत्रकार दिन साजरा करतात. विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते तसेच जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे रचिटणीस अध्यक्ष अॅड नितीन ठाकरे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होईल.
यंदा होणाऱ्या कार्यक्रमात अझहर शेख (लोकमत), सौरभ बेंडाळे (महाराष्ट्र टाइम्स), संजय चव्हाण (सकाळ), मनीष कटारिया (आपला महानगर), संकेत शुक्ल (पुण्यनगरी), सचिन जैन (दिव्य मराठी), वैशाली शहाणे (देशदूत), सतीश डोंगरे (पुढारी), चारुशीला कुलकर्णी (लोकसत्ता) यांचा गौरव होणार आहे. यावेळी सह्याद्री सुपर स्पेशालिटी रुग्णालयातर्फे पत्रकारांसाठी वैद्यकीय उपचार, तपासण्या व सहाय्य यासाठी उपयुक्त असलेले प्रिव्हीलेज कार्ड वितरित केले जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.