आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोविड कवचाकडेच पाठ:साडेदहा लाख डोस पडून; 8,15,000 नागरिकांनी दुसरा डोसच घेतला नाही

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविडचा धोका कमी करण्यासाठी कोविड लसीकरणावर चांगलाच भर देण्यात आला. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका कमी झाल्याने दुसरीकडे कोविड लसीकरणाची गतीही संथ झाली. नाशिक जिल्ह्यात तब्बल दहा लाख ६७ हजार लसींचे डोस पडून आहे. महत्वाचे म्हणजे, पहिल्या डोसच्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाणही कमी असून ८ लाख १५ हजार नागरीकांनी दुसरा डोसच घेतलेला नाही. पहिल्या डोस घेतलेल्यांचे प्रमाण ८८ टक्के आहे. तर दुसऱ्या डोस घेतलेल्यांचे प्रमाण ७० टक्के आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरुवातीला १८ वयापुढील नागरीकांचे लसीकरण झाले. त्यानंतर १५ ते १८ वयोगटासाठीही लसीकरण झाले. आता १२ ते १४ वयोगटासाठी लसीकरण सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात १२ वर्षांवरील सर्व वयोगटातील नागरिकांची संख्या ५७ लाख ४० हजार ८१४ आहे. त्यापैकी ५० लाख ७९ हजार ३३६ नागरीकांनी अर्थात ८८.४८ टक्के पहिला डोस घेतला आहे. त्यातील ४० लाख ६६ हजार ८६ नागरिकांनी ७०.८२ टक्के लसीचा दुसरा डोस घेतला आहे. एकूण लोकसंख्येपैकी ६ लाख ६१ हजार नागरिकांनी पहिला तर ८ लाख १५ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत कोविशिल्ड, कोव्हॅक्सीन, कॉर्बेव्हॅक्स या तिन्ही लसींचे ९२ लाख १७ हजार २२० डोस उपलब्ध झाले असून त्यातील १० लाख ६७ हजार ६६० लसीचे डोस पडून आहेत. काेविशिल्डला ९ महिने तर काेव्हॅक्सिनला १२ महिन्यांची मुदत असते. सध्या जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या लसींचा साठा पुढील तीन महिने तरी एक्स्पायर होणार नाही.

१२ ते १४ वयोगटातील ७९% मुलांचे लसीकरण
जगभरातील काही देशांमध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारने पुन्हा लसीकरणावर भर दिला. या मोहिमेत १२ ते १४ वयोगटासाठी लसीकरण सुरू झाले. जिल्ह्यातील दोन लाख २१ हजार ८४२ एकूण मुलांपैकी एक लाख ७५ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ५८ हजार १४ मुलांनी दुसरा डोस घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची टक्केवारी ७९ टक्के आहे.

बुस्टर डाेसकडेही दुर्लक्ष : बुस्टर डाेसकडेही नागरिकांची पाठ आहे. जिल्ह्यात फक्त एक लाख १७ हजार, ८२२ जणांनी बुस्टर डाेस घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...