आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्या दौऱ्यासाठी नाशिकच्या शिवसैनिकांचे शक्तीप्रदर्शन:आदित्य ठाकरेंसोबत जाणार दिड हजार शिवसैनिक, 15 जूनला दौरा

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदुत्वाच्यामुद्यावरून मनसे व शिवसेनेत सुरू झालेल्या चढाओढीदरम्यान येत्या 15 जून राेजी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दाैऱ्यामुळे नवा अंक रंगणार आहे, अयोध्या दौऱ्यात नाशिकमधील दिड हजार शिवसैनिकांना नेले जाणार असून त्यांच्यामार्फत जाेरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी स्थानिक शिवसेना नेत्यांनी सुरू केली आहे.

येत्या 13 तारखेला दिड हजार शिवसैनिक विशेष अयोध्या रेल्वेने रवाना हाेणार असून पुर्वतयारीसाठी प्रमुख नेते लवकरच अयाेध्येत डेरेदाखल हाेणार आहेत. मे महिन्यात आदित्य ठाकरे यांचा अयाेध्या दाैरा जाहीर झाला हाेता. या दाैऱ्याच्या तयारीसाठी शिवसेना संपर्कनेता तथा खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांना अयाेध्येला पाठवलेही हाेते. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयाेध्या दाैरा चांगलाच गाजला. त्यावरून मनसे व शिवसेनेत कलगीतुराही रंगला. त्यानंतर राज यांचा प्रकृतीच्या कारणास्तव दाैरा रद्द झाला.

आता आदित्य यांचाही दाैरा 10 जूनऐवजी 15 जूनपर्यंत पुढे ढकलला गेला. आता 15 जून राेजी हा दाैरा हाेणे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे या दाैऱ्याच्या नियाेजनासाठी नाशिक शिवसेना सक्रीय झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रमुख विजय करंजकर,महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि माजी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांच्याकडे प्रमुख जबाबदारी आली आहे.

बातम्या आणखी आहेत...