आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भोकणी:कोरोनाच्या भीतीने भोकणी येथे कॉरंटाईन सेंटरमध्ये गळफास घेऊन एकाची आत्महत्या

आत्महत्याएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना बाधीताशी जवळून संपर्क आल्याने कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवलेल्या 57 वर्षीय पुरुषाने कोरोना झाल्याच्या भीतीपोटी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका भोकणी येथे घडली. जाखू बाळू मेंगाळ (57)असे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

जाखू मेंगाळ हे कावीळसह इतर साध्या आजारांवर रुग्णांना वनौषधी देऊन बरे करणारे वैद्य म्हणून परिसरात परीचित होते. भोकणीपासून जवळच असलेल्या दोडी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मेंगाळ यांच्याकडे काविळीचे औषध घेण्यासाठी येऊन गेला होता. त्यामुळे मेंगाळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील १७ जणांचा या रुग्णांशी संपर्क आला होता. आरोग्य विभागाने केलेल्या ट्रेसिंग मध्ये हे स्पष्ट झाल्याने त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भोकणी येथील प्राथमिक शाळेच्या खोल्यांमध्ये यातील १२ जणांना १३ जून पासून कॉरंटाईन केले होते. तर आणखी ५ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. जाखू मेंगाळ यांचा कोरोना बाधीताला कावीळचे औषध देतांना त्याच्याशी थेट संपर्क आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना प्राथमिक शाळे शेजारीच असलेल्या अंगणवाडीच्या खोलीमध्ये स्वतंत्र विलगीकरण केले होते. आपल्यालाही कोरोनाची लागण झाली असावी, अशी भीती त्यांनी कुटुंबीयांकडे बोलून दाखवली होती. त्याच भीतीपोटी त्यांनी मंगळवारी (दि.२३) पहाटे अंगणवाडीतील मुलांचे वजन घेण्यासाठी लावलेल्या दोरीस गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ यांना ही माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...