आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुकाची थाप:नाशिकमध्ये राज्यपातळीवरील दीडशे गुणवंत फुटबॉल खेळाडूंचा गौरव

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुटबॉल खेळ हा अतिशय लोकप्रिय असून, त्यात सांघिक भावनेचे दर्शन घडते, किंबहुना सर्व एकसंग राहिल्यास यश निश्चितच आपले असते. या खेळामुळे शारीरिक कसरतही चांगली होते. त्यामुळे या खेळात खेळाडूंनी प्राविण्य मिळवावे, असे आवाहन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले.

दोन वर्षांनंतर कार्यक्रम

अमॅच्युअर फुटबॉल अकॅडमी, नाशिकरोडच्या वतीने गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. धर्माधिकारी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. शिखरेवाडी मैदान येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रास्ताविक संस्थेचे सरचिटणीस सुनील ढगे यांनी केले. कोविड महामारीमुळे दोन वर्षे हा कार्यक्रम करता आला नाही, असे ढगे यांनी सांगितले. प्रथम मान्यवरांचे हस्ते गणेश पूजन करण्यात आले. व्यासपीठावर माजी नगरसेवक संभाजी मोरुजकर, शैलेश ढगे, अंबादास पगारे, क्लब अध्यक्ष निवृत्ती चाफळकर, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

दीडशे खेळाडूंचा सत्कार

या कार्यक्रमात १५० गुणी खेळाडूंचा प्रमाणपत्रे, स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तर राज्यपातळीवर निवड झालेल्या गौरी सोनवणे, श्रावणी गुरव, वैष्णवी पाटील आदींना पुरस्कार देण्यात आले. कोच कृतीक फौजी, गुणगुण यांना ही गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल जाधव, राजू शहाणे, शिरीष खाडे, श्रीकांत पवार, प्रदीप बागुल आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचलन व आभार गुणवंत कामगार प्रशांत कापसे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...