आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीच्या वादातून एकाचा खून:नाशिकमध्ये 2 आदिवासी कुटुंबात तुंबळ हाणामारी; इगतपुरीच्या आधारवड गावातील घटना

नाशिक19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमिनीच्या वादातून दोन आदिवासी कुटुंबात झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार इगतपुरी तालुक्यातील आधारवड गावात शनिवारी, 11 जून रोजी पहाटे उघडकीस आली. संतप्त जमावाने यावेळी बारशिंगवे वस्तीवरील घरेही जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

तालुक्यातील आधावरड येथील कातकरी वस्तीवर शनिवारी ( ता.11 रोजी ) पहाटे 3 वाजेच्या सुमाराला 20 वर्षीय तरुणाचा जमावाकडून खून करण्यात आला. यासह 3 कातकरी कुटुंबाची घरे जाळून टाकण्यात आली. यामुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ माजली आहे. शरद वाघ असे या व्यक्तीचे नाव आहे. घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, मोठा जमाव कातकरी वस्तीवर चाल करून आला. वाघ यांच्या कुटुंबीयांनी प्रतिकार केला तर टोळक्याने त्यांना लाठ्या, काठ्यांनी बेदम मारहाण केली. वस्तीवरील घरे पेटवत दहशत माजवण्याचा प्रयत्न यांच्याकडून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...