आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडक:पेठराेड परिसरात अपघातात एक ठार ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेठरोड येथे झालेल्या अपघातात अनोळखी वाहनांच्या धडकेत दुचाकीचालक ठार झाला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि राहुल तांदळे (रा. कोळवाडा, हिरावाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भाऊ संतोष बाळकृष्ण चारोस्कर (२९, रा. मखमलाबाद) हे दुचाकीने (एमएच १५ ईआर ६६२३) जात असतांना प्रभातनगर येथे भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला सोमरुन धडक दिली. यात संतोष चारोस्करच्या डोके व पाेटास गंभीर मार लागला. रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...