आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवदर्शन:पुलाच्या कठड्याला दुचाकी धडकून एक ठार, दाेघे गंभीर

तीर्थपुरी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाेखर्णी येथे देवदर्शनासाठी जाताना दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकून झालेल्या भीषण अपघातात एक ठार तर दाेघे गंभीर जखमी झाले. हा अपघात परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे शनिवारी झाला.

तीर्थपुरी येथील भगवान शहाणे, अरुण टाकसाळ व पांडुरंग परभाळे हे शनिवारी दुचाकीने (एमएच २० डीएक्स.६४५४) परभणी जिल्ह्यातील पोखर्णी येथील प्रसिद्ध नृसिंहाच्या दर्शनासाठी जात हाेते. पाथरी तालुक्यातील रामेटाकळीजवळ भरधाव दुचाकी ही एका वळणावरील लोखंडी कठड्यास जोरात धडकली. या अपघातात भगवान शहाणे (६०) हे जागीच ठार झाले, तर अरुण टाकसाळ आणि पांडुरंग परभाळे हे गंभीर जखमी झाले.

बातम्या आणखी आहेत...