आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यमान भाजप शहराध्यक्ष गिरीष पालवे यांच्याबाबत वाढत्या तक्रारी, संपलेला कार्यकाळ बघता नवीन नियुक्तीसाठी यापुर्वी पालिकेत वजनदार पदे भुषवलेल्यांनी लाॅबिंग सुरू झाल्यानंतर आज शनिवारी नाशिक दाैऱ्यावर असलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे व नाशिकचे प्रभारी तथा ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांच्याकडून ‘एक व्यक्ती एक पद’ या फाॅर्म्युलाद्वारे संभाव्य शहराध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे.
जर शहराध्यक्षपद हवे असेल तर नगरसेवकपदावर पाणी साेडावे लागणार असून संबधित व्यक्तीच्या घरातही काेणतेही पद न देण्याचा फाॅर्म्युला मांडला जाणार असल्याचे समजते. त्यामुळे वर्षानुवर्ष पक्षासाठी संतरज्या उचलणारे किंबहुना संघटनेत दुय्यम फळीत काम करणाऱ्यांना यानिमित्ताने न्याय मिळण्याची चिन्हे आहेत.
‘पार्टी विथ द डिफरन्स’ असा नारा असलेल्या भाजपाची दिवसाेंदिवस नाशिकमधील स्थिती खराब हाेत आहे. मध्यंतरी, जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पक्षाशी उघडपणे गद्दारी करूनही कारवाई न झाल्यामुळे पक्षविराेधी काम करा व महत्वाची पदे मिळवा असा संदेश गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपाचे जुने जाणते पदाधिकारी कमालीचे अस्वस्थ आहे. त्यात घंटागाडी ठेक्याशीसंबधित वादग्रस्त ठेकेदारांकडे महत्वाची पदे दिल्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाली. त्यातून पक्ष अद्यापही सावरलेला नाही.
अशातच शहराध्यक्षपदासाठी खांदेपालट सुरू झाल्यानंतर पुन्हा पालिकेत वजनदार पदे भुषवणाऱ्यांकडूनच माेर्चबांधणी सुरू झाल्यामुळे संघटनेतील पदाधिकारी नाराज झाले आहेत. ही बाब पक्षश्रेष्ठींनी गांर्भीयाने घेतली असून कसबा पाेटनिवडणुकीप्रमाणे अतंर्गत नाराजी वाढू नये यासाठी माजी नगरसेवकांना पद हवे असेल तर घरातील अन्य काेणत्याही व्यक्तीला पालिकेत संधी मिळणार नाही असे सांगितले जाणार आहे. हाच पॅटर्न खासदार व आमदारांबाबतही केंद्रीय भाजपाने लागु केल्यानंतर त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षाची जबाबदारी देवू नये असा निर्णय प्रदेश भाजपाने घेतला हाेता.
मंडल अध्यक्ष, कार्यकारणी पदाधिकाऱ्यांना संधी कधी ?
पालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू असल्यामुळे माजी नगरसेवक बैचेन आहेत. त्यामुळे त्यांनी संघटनेची सूत्रे हवी आहेत. स्वत:च्या साेयीने पदे घेण्यासाठी त्यांनी वरिष्ठांकडे लाॅबींग सुरू केल्यामुूळे मंडल अध्यक्ष तसेच शहर कार्यकारणी पदाधिकारी नाराज आहेत. आम्हाला संधी कधी देणार यासाठी ते बावनकुळे व महाजन यांना साकडे घालणार आहेत.
तर यांची हाेणार अडचण
शहराध्यक्षपदासाठी गणेश गिते, हिमगाैरी आहेर-आडके, जगदीश पाटील, प्रशांत जाधव, अनिल भालेराव, अरूण पवार, संभाजी माेरूस्कर, अजिंक्य साने यांची नावे चर्चत आहेत. त्यामुळे शहराध्यक्षपद घेतले तर नगरसेवकपदावर पाणी साेडावे लागेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.