आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:एक संशयित ताब्यात, तीन फरार; पोलिस आयुक्तांची पत्रकार परिषदेत माहिती

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड औद्योगिक वसाहतीमधील आहेर इंजिनिअरिंग कंपनीचे व्यवस्थापक नंदकुमार आहेर यांच्या खुनाच्या गुन्ह्यात चार संशयितांची नावे निष्पन्न झाली असून यातील एकास ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिस आयुक्तांनी अंबड येथे खून झाल्यानंतर तत्काळ पत्रकार परिषद घेत या गुन्ह्याची माहिती दिली. नंदकुमार आहेर हे कंपनीचे व्यवस्थापक आहेत. पंधरा दिवसांपूर्वी यातील एका संशयिताच्या आईचा आहेर यांनी अपमान करत या महिलेला कामावरुन काढून टाकले होते. या अपमानाचा बदला घेण्यासाठी तिच्या मुलाने तीन साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पूर्ववैमनस्य, आर्थिक वाद यावरून हा खून झाल्याची चर्चा होती. मात्र, हा खून अपमानाचा बदला घेण्यासाठी झाल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

रक्ताच्या डागांवरून माग
संशयित हल्लेखोर आहेर यांच्यावर वार करत असताना आहेर यांना पकडून ठेवलेल्या संशयित सूर्यवंशी याच्या मांडीत चाॅपरचा वार लागल्याने तो जखमी झाला. त्याला दुचाकीने पळवून नेताना रक्ताचे रस्त्यावर पडलेल्या डागांच्या आधारे पोलिसांनी एका खासगी रुग्णालयापर्यंत माग काढत त्यास ताब्यात घेतले. तीन संशयित फरार आहे.

हल्लेखोर जखमी
संशयितांनी तलवार, चॉपरचा वापर केला. आहेर यांना कंपनीच्या प्रवेशद्वारावर घेरून हल्ला केला. आहेर यांच्यावर चॉपरचा वार करताना तो एका हल्लेखोराच्या मांडीला लागला. अविनाश रामचंद्र सूर्यवंशी (१९) असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे.

बातम्या आणखी आहेत...