आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यापासून 3 दिवस गारपिटीसह पावसाचा जोर:पावसामुळे कांदा, द्राक्ष उत्पादक चिंतेत; राज्यातील 13 जिल्ह्यांत अधिक पावसाची शक्यता

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या हवामानामुळे राज्यात मुंबई व कोकण वगळता उर्वरित भागात गुरुवार, १६ मार्च ते शनिवार, १८ मार्चपर्यंत तीन दिवस अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे.

दरम्यान, राज्यात मंगळवारी नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने कांदा व द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता वाढली. विदर्भात गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड तसेच मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात अधिक पावसाची शक्यता आहे.

आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे अवकाळी पाऊस
देशाच्या मध्यवर्ती भूभागात पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकणारा हवेच्या कमी दाबाचा आस व पूर्वेकडून पश्चिमेकडे तसेच बंगालचा उपसागर व आग्नेयेकडून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या मिश्रणातून हा अवकाळी पाऊस पडत असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...