आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांदा लिलाव:नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही कांदा लिलाव बंद, केंद्राने कांदा साठवणुकीवर मर्यादा घातल्याने व्यापाऱ्यांचा अप्रत्यक्ष बंद

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लिलावात सहभागी व्हावे यासाठी बाजार समितीने व्यापाऱ्यांना पत्र पाठवले आहे.

नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव बंद आहे. जिल्ह्यामधील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद आहे. केंद्र सरकारने घाऊक व्यापाऱ्यांना 25 टन व किरकोळ व्यापाऱ्यांना दोन टनाची मर्यादा ठरवून दिली. यामुळे व्यापाऱ्यांनी लिलावामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारी जिल्ह्यात प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोमवारी कांदा लिलाव न झाल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. आजही लिलाव बंद आहे.

लिलावात सहभागी व्हावे यासाठी बाजार समितीने व्यापाऱ्यांना पत्र पाठवले आहे. मात्र बाजार समिती प्रशासनाला व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. केंद्राने कांदा साठवणुककीवर मर्यादा घातल्याने लिलाव बंद आहे. कांदा साठवणूक मर्यादा रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. कांद्याचे लिलाव बंद असल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.

किरकोळ बाजारांमध्येही आता कांद्याचे दर शंभर रुपयापर्यंत पोहोचले आहे. हे दर नियंत्रणात आणता यावेत यासाठी केंद्र सरकारने कांदा साठेबाजीवर निर्बंध घातले. निर्यात बंदी, आयकर धाडी आणि आता साठवणुकीवर मर्यादा यामुळे व्यापारी वर्गाने कांदा लिलावावर बेमुदत संप सुरू केला आहे. मात्र याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे. कांद्याला सध्या चांगला भाव मिळत आहे. मात्र या सर्व घटनांमुळे कांद्याचे भाव घसरणार आहेत. शेतकऱ्याला त्याचा फटका बसणार आहे.