आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांदा कोंडी आज फुटली:...अखेर 5 व्या दिवशी नाशिकमध्ये कांदा लिलाव झाला सुरू, शरद पवारांच्या मध्यस्थीमुळे निघाला तोडगा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • होलसेल व्यापारी 25 टन आणि किरकोळ व्यापाऱ्यांना 2 टन पेक्षा जास्त कांद्याची साठवणूक करता येत नव्हती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अघोषित बंद पुकारला होता.

अखेर पाच दिवसांनंतर नाशिकमधील कांदा कोंडी आज फुटली आहे. शुक्रवारीपासून येथे कांद्याचे लिलाव सुरू झाले आहेत. कांदा साठवणुकीवर केंद्र सरकारकडून निर्बंध लावण्यात आले होते. होलसेल व्यापारी 25 टन आणि किरकोळ व्यापाऱ्यांना 2 टन पेक्षा जास्त कांद्याची साठवणूक करता येत नव्हती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अघोषित बंद पुकारला होता. यावर शरद पवारांनी चर्चा करुन तोडगा काढला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत व्यापाऱ्यांना कांदा लिलाव पुन्हा सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शरद पवारांनी नाशिकमध्ये जाऊन याविषयावर चर्चाही केली होती. पाठोपाठ केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांना दिलासा देत कांद्याची खरेदी विक्री, प्रतवारी आणि पॅकेजिंग साठी 3 दिवसांची मुदत दिली. त्यामुळे निर्बंध हटवले नाही मात्र तरीही कांदा लिलाव सुरू होण्याच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.

आज पाच दिवसांनंतर कांदा लिलाव झाला. सकाळी फक्त 50 वाहनातील 600 क्विंटल उन्हाळ कांदा विक्रीस आला आहे. कांदा भावात कोणताही बदल न होत पाच दिवसापूर्वी लिलावात जाहीर झालेला सर्वाधिक कांदा भाव 5900 रूपये जाहीर झाला. तर लाल कांद्याची आवक थोडीही झालेली नाही . सकाळी 1500 ते 5900 रूपये व सरासरी 5100 रूपये भाव जाहिर झाला.