आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Onion Export Ban And Import Is A Contradictory Decision Of The Center, Traders Should Not Do Injustice To Farmers; Sharad Pawar's Advice To Traders

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक:कांदा निर्यातबंदी आणि आयात हा केंद्राचा परस्परविरोधी निर्णय, शेतकऱ्यांवर व्यापाऱ्यांनी अन्याय करु नये; शरद पवारांचा व्यापाऱ्यांना सल्ला

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने कांदा हा जीवनावश्यक वस्तुच्या यादीतून वगळला असला तरीही दर वाढताच निर्यात बंदी करणे हा योग्य निर्णय नाही. केंद्राने निर्यात बंदी करुन कांदा आयातीला चालना दिली आहे हा शेतकऱ्यांप्रती परस्परविरोधी निर्णय असुन याबाबत लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि व्यापारी यांचे शिष्टमंडळासह लवकरच केंद्रातील जबाबदार मंत्र्यांशी भेट घेणार असल्याचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी सांगितले.

केंद्रीय माजी कृषीमंत्री शरद पवार हे बुधवारी नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी भुजबळ नॉलेज सिटी येथे कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यासोबत चर्चा केली.यावेळी शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी पवार यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले असतांना त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले की,राज्यात काही जिल्ह्यांचे वैशिष्ट्य निर्माण झाले आहे असुन त्यामध्ये कांदा चर्चा आली की नाशिकचे वैशिष्ट्ये हे देशपातळीवर दिसुन येते.कांदा दरात वाढ झाली असतांनाच केंद्राने निर्यात बंदी आणि आयातीचे धोरण पत्करले आहे. त्याची झळ ही नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना सध्या बसत आहे.ज्यावेळी मी कृषिमंत्री होतो, तेव्हा कांदा दर वाढले असतांना विरोधक असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालुन प्रश्न उपस्थित केला होता. मात्र त्यावेळी मी ठामपणे कांदा उत्पादकांच्या बाजुने उभा राहुन निर्यातबंदी केली नाही. कांदा निर्यात आणि आयातीचा निर्णय घेण्याचे अधिकार हे केंद्राला असतात, हा अधिकार राज्याला नसतो.व्यापाऱ्यांनाही कांदा वाहतुक करणे परवडत नसल्याने केंद्राने व्यापाऱ्यांवरील साठवणुक मर्यादेची अट रद्द करावी. सध्या कांदा उत्पादक हा फक्त दर वाढीसाठीच नाही तर त्यांची पावसामुळे देखील नुकसान झाले आहे, त्यामुळे ते अगोदरच त्रस्त आहे. आता व्यापाऱ्यांनी लिलाव बंद करुन शेतकऱ्यांची गैरसोय करु नये आणि कांदा लिलाव सुरु करण्याचा सल्ला व्यापाऱ्यांना दिला.

कांदा उत्पादन घेणारा शेतकरी हा जिरायतीभागातील असतो, त्यामुळे त्यांना दोन पैसे मिळायला लागल्यावर ओरड करु नये असे सांगितले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर,सरोज अहिरे, माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, माजी आमदार जयवंत जाधव,जिल्हाधिकारी सुरज मांढरे, कृषी सहसंचालक संजीव पडवळ,हेमंत टकले, रविंद्र पगार, जगदिश होळकर,राजेश जाधव, जयदत्त होळकर,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, संदिप लुणावत, योगेश रायते,निवृत्ती न्याहारकर, कोंडाजी आव्हाड,हंसराज वडघुले, भारत दिघोळे यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.

जेवणाचा आणि कांद्याचा खर्च काढा

तयार जेवणाचा दर आणि कांद्याचा खर्च काढला तर नक्कीच कांद्याला काहीही दर लागत नाही. जेवणातील भात, चपाती, दाळीपेक्षा कांदा नक्कीच स्वस्त आहे. त्यामुळे कधी कधी कांदा दर वाढल्यानंतर चिंता का करावी असे शरद पवार यांनी भाजपाला टोला लगावला.

लासलगाव आणि धाडी

कांदा दर वाढल्यावर व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या धाडी पडतात हे पुर्वीपासुन आहे. परंतू लासलगावच्या व्यापाऱ्यांवर अधिकच पडतात,त्यामुळे आयकर विभागाचे लासलगाववर जास्त प्रेम दिसते.तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांना कांदा बियाणे रास्त दरात व मुबलक मिळावे यासाठी काळजी घेण्याबाबत सांगितले जाईल असे शरद पवार यांनी सांगितले.अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांबाबत ही संबधीत अधिकाऱ्यांनी पंचनामे केले असतील नुकसानग्रस्तांना मदतीबाबत संबधितांना सांगितले जाण्याचे यावेळी स्पष्ट केले.

यावेळी कांदा उत्पादकांचे प्रश्न हंसराज वडघुले, राजेंद्र भामरे,निवृत्ती न्याहारकर, रांजेद्र डोखळे,दिलीप बनकर, शैलेंद्र पाटील, भारत दिघोळे, योगेश रायते यांनी मांडले, तर व्यापाऱ्यांचे प्रश्न लासलगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार डागा यांनी मांडले.