आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कांदा निर्यातीवर बंदी:केंद्र सरकारच्या निर्णयानंतर कांद्याच्या दरात क्विंटल मागे 1000 रुपयांची घसरण, भाव कोसळल्याने शेतकरी संतप्त; लासलगावात लिलाव पाडले बंद

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निर्यातबंदीमुळे उत्पादकांचे नुकसान होईल, केंद्राच्या निर्णयावर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

कांद्याच्या दरांत वाढीची शक्यता पाहून केंद्र सरकारने सोमवारी कांद्याच्या निर्यातीवर अमर्याद कालावधीसाठी बंदीचा घातली आहे. यामुळे दरांत क्विंटल मागे 1000 रुपयांनी घसरण झाली. चांगला दर मिळताच केंद्राने निर्यातबंदी करून अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप केल्याने उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र अन्याय होणार आहे.

निर्यात बंदीमुळे उत्पादकांचे नुकसान होईल, केंद्राच्या निर्णयावर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

दरम्यान कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर नाशिकमधील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, "कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहे. आता आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणातील कांदा कोठे साठवणार? आम्ही हा कांदा आता कुठे विकू?" असा सवालही या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान नाशकात कांदा 20-25 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. निर्यातीवर बंदी घातल्यास किंमती प्रतिकिलो 2-3 ते रुपयापर्यंत घसरतील. यामुळे उत्पादकांचे नुकसान होईल. असे काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

लासलगावात लिलाव पाडले बंद

कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव येथे निर्यात बंदीचा परिणाम पाहायला मिळाला. निर्यात बंदीच्या निर्णयामुळे कांद्याच्या भावात क्विंटल मागे 1000 रुपयांची घसरण झाली. भाव कोसळल्याचे पाहून शेतकरी संतप्त झाले असून येथील लिलाव बंद पाडण्यात आले.

भविष्यात दर तेजीतच राहणार

पावसामुळे लाल कांदा 15 ते 20% खराब झाला आहे. रांगड्या कांद्याचे रोप खराब झाल्याने उत्पादनावर परिणाम होईल. उन्हाळ कांद्याच्या बियाण्यांच्या टंचाईमुळे उत्पादन घटू शकते. त्यामुळे दर तेजीतच राहू शकतात, असे एनएचआरडीएफचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डॉ. सतीश बोंडे यांनी सांगितले.

पाकिस्तान घेणार संधीचा फायदा

कांदा निर्यातबंदी झाल्यानंतर पाकिस्तानातील निर्यातदार भारतीय निर्यातदारांच्या ग्राहकांशी संपर्क साधतील. त्यांना भारतापेक्षा कमी दराने कांदा विकून संधीचा फायदा घेतील. - विकास सिंग, कांदा निर्यातदार