आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण झाल्याचे निष्पन्न:कांदा व्यापाऱ्यांना अपहरण करून लुटले

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाॅटेल जत्रा चौफुली येथे रात्री ११ वाजता एमएच ४१ क्यु ७७५२ या दुचाकीवरील दोघे मित्र चौकात उभे असताना सिल्व्हर रंगाच्या कारमधून तीन तरुण उतरले. दुचाकीवरील दोघांना लाकडी दांडे काढून बेदम मारहाण करत त्यांना कारमध्ये टाकून अपहरण करून घेऊन गेले. पाेलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दुचाकी नंबरच्या आधारे पोलिसांनी ओमकार राऊत आणि जयपाल गिरासे या दोघांचे अपहरण झाल्याचे निष्पन्न केले.

पथकाने संशयित कारचा औरंगाबादरोडपर्यंत माग काढला. संशयितांना दोघांना कारमध्ये बेदम मारहाण करत ६ हजारांची रोकड आणि दोन मोबाइल लुटून नेल्याची माहिती दिली. कांदा खरेदीच्या व्यावहारातून हा प्रकार घडल्याची माहिती आडगाव पोलिसांनी दिली. वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...