आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशप्रक्रिया:11 वीचे यंदाही ऑनलाइन प्रवेश, महाविद्यालयांत 25 हजार जागा ; अर्जाचा भाग 1 भरण्याची सुविधा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी यंदाही केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया राबविली जाणार आहे. नाशिकसह राज्यभरातील प्रमुख शहरांतील कनिष्ठ महाविद्यालयांत या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहे. दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार असून त्यापूर्वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा ३० मेपासून सुरू केली आहे. प्रवेश अर्जाचा भाग एक व भाग दोन या पद्धतीने प्रवेशाची सर्व प्रक्रिया होईल. नाशिक शहरात ६० कनिष्ठ महाविद्यालये असून त्यात कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त शाखा मिळून सुमारे २५ हजार जागा उपलब्ध आहेत. नाशिकसह राज्यातील मुंबई, पुणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रांत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होईल. तर ग्रामीण भागात तसेच इतर शहरांमध्ये ऑफलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया होईल. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रॅक्टिस व्हावी यासाठी २३ ते २७ मेदरम्यान ‘मॉक डेमो रजिस्ट्रेशन’ची सुविधा दिली होती. प्रवेश अर्ज कसा भरावा याची माहिती विद्यार्थ्यांना या सुविधेमुळे मिळाली. ३० मेपासून https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा दिली आहे. यामध्ये वैयक्तिक माहितीसह इतर माहिती भरणे अनिवार्य असेल. अर्ज प्रमाणित करून घेता येणार आहेत. आयडी व पासवर्ड वापरून लॉगीन करता येतील. ऑनलाइन शुल्क भरून फॉर्म लॉक करणे आणि अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र निवडणे अशा सुविधा दिल्या आहेत. माध्यमिक शाळा व मार्गदर्शक केंद्रांनी प्रवेश अर्ज भाग एकमधील माहिती तपासून प्रमाणित करणे अनिवार्य आहे.

..अशी होईल प्रवेशप्रक्रिया https://11thadmission.org.in या पोर्टलद्वारे केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने अकरावीचे प्रवेश होतील. वेळापत्रक या पोर्टलवर जाहीर होईल. पोर्टलवर पहिल्या टप्प्यात विद्यार्थी नोंदणी, दुसऱ्या टप्प्यात प्रवेश अर्ज भाग एक भरणे व तिसऱ्या टप्प्यात अर्जाचा भाग दोन भरणे. भाग दोनमध्ये विद्यार्थ्यांना पसंतीच्या कॉलेजचा क्रम नोंदविण्याची प्रक्रिया दहावीच्या निकालानंतर सुरू होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...