आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन प्रवेश:आजपासून पदवी प्रथम वर्षाचे ऑनलाइन प्रवेश ; प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केटीएचएम महाविद्यालयात गुरुवारपासून (दि.९) पदवी प्रथम वर्षाचे ऑनलाईन प्रवेश सुरू होणार आहे. केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष पदवी वर्गाचे प्रवेश ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे होणार आहेत. प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी https://mvperp.org या संकेत स्थळाला भेट देऊन आपला मेरीट फॉर्म भरावयाचा आहे. मेरीट फॉर्म भरण्यासाठी दि. ९ ते २२ जून २०२२ पर्यंत संकेतस्थळ उपलब्ध असेल. मेरीट यादीसाठी महाविद्यालयाच्या संकेतस्थस्थळास भेट द्यावी, अशी माहिती प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी दिली. एफ.वाय बीए, बीएसस्सी, बी. कॉम, बीबीए, बीएसस्सी बायोटेक, बी. व्होक, बीएसस्सी, कॉम्प्युटर सायन्स, बीएसस्सी अॅनिमेशन यांसह इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. एचपीटी आरवायकेत १८ जूनपासून अर्ज : गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित एचपीटी-आरवायके महाविद्यालयात १८ जूनपासून पदवी प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, अशी माहिती प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...