आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:पेठे विद्यालयात ऑनलाइन यूथ मॅनेजमेंट सिस्टिम कार्यशाळा ; स्काउट-गाइड, संघटक, प्रशिक्षक सहभागी

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत स्काउट आणि गाइड, दिल्ली राष्ट्रीय कार्यालयाच्या ‘व्हिजन २०२४’ अंतर्गत येथील पेठे विद्यालयात एकदिवसीय नाशिक विभागस्तरीय ऑनलाइन यूथ मॅनेजमेंट सिस्टिम कार्यशाळा झाली. कार्यशाळेस नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील स्काउट-गाइड जिल्हा संघटक, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त, कार्यालयीन कर्मचारी, युनिट लीडर्स उपस्थित होते. यूथ मॅनेजमेंट सिस्टिम या संपूर्ण प्रक्रियेचे राज्यातील सर्व जिल्ह्यांतील स्काउट-गाइड जिल्हा संघटक, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त, कार्यालयीन कर्मचारी, युनिट लीडर्स यांना माहिती व्हावी या उद्देशाने नाशिक येथे राज्य संस्थेच्या नियोजनानुसार राज्य समन्वयक आणि औरंगाबाद भारत स्काउट-गाइड विभागाच्या विभागप्रमुख प्रिया अदाने, जिल्हा संघटक श्रीनिवास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागस्तरीय ऑनलाइन यूथ मॅनेजमेंट सिस्टिम कार्यशाळा पार पडली. याप्रसंगी जिल्हा संस्था उपाध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर, सेक्रेटरी राजेंद्र निकम, विभागप्रमुख चंद्रकांत फुलपगारे, पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास पाटील यांच्यासह स्काउट जिल्हा प्रशिक्षण आयुक्त नवनाथ वाघचौरे, विभागातील स्काउट-गाइड जिल्हा संघटक, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त, कार्यालयीन कर्मचारी माेठ्या संख्येने उपस्थित होते. प्रिया अदाने यांनी मार्गदर्शन केले.

व्यवस्थापन डिजिटल करण्यासाठी प्रयत्न देशातील स्काउट-गाइड गुणवत्ता वाढीसंदर्भात राष्ट्रीय कार्यालयाने देशातील सर्व राज्य संस्थांच्या सहभागातून सांख्यिकीय नियोजन आराखडा तयार केला असून त्या अंतर्गत ‘व्हिजन २०२४’ची आखणी करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी देशभर सुरू झाली आहे. त्यातील सदस्यसंख्या वाढवून स्काउट-गाइडचे संपूर्ण व्यवस्थापन डिजिटल स्वरूपात करण्यासाठी ऑनलाइन यूथ मॅनेजमेंट सिस्टिम अस्तित्वात आणली आहे. नवीन प्रणालीमुळे स्काउट-गाइडचे व्यवस्थापन नियोजनबद्ध होईल.

बातम्या आणखी आहेत...