आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Only Thackeray And Pawar, Who Are Shukracharyas In Zari, Took The Criticism Of Former Minister Chandrashekhar Bawankule, Who Played A Role In The OBC Reservation Protest.

ठाकरे, पवार झारीतील शुक्राचार्य:ओबीसी आरक्षणाविरोधात दोघांनी भूमिका घेतली; चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसी आरक्षणाविराेधात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुमिका घेतली हाेती. महाविकास आघाडी सरकारने निरगुडे आयाेगाला साडेचारशे काेटी रुपयांचा निधी देखील नाकारला.ओबीसी आरक्षणाविराेधात ठाकरे व पवार दाेन्ही नेते झारीतील शुक्राचार्य असल्याची टीका माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे केली.

नाशिक दाैऱ्यावर माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी आले हाेते. यावेळी शहर भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडल्यानंतर त्यांनी तात्काळ बांठिया आयोगाचा अहवालाची तपासणी करत त्यातील त्रुटी दूर करत सर्वोच्च न्यायालयात सादर केला.यामुळेच न्यायलयात ओबीसी आरक्षणास मान्यता मिळाली. ओबीसी आरक्षण मिळविण्याचे खरे श्रेय शिंदे - फडणवीस यांनाच आहे. राज्यातील महविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाचे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर न झाल्याने आरक्षण गमावावे लागले. छगन भुजबळ,विजय वडेट्टीवार यांनी न्यायालयात याेग्य भुमिका मांडलीच नाही. परिणामी राज्यात अनेक ग्रामपंचायत,नगरपालिका,पालिका िनवडणुका या ओबीसी आरक्षणाविनाच पार पडल्या.महाविकास आघाडीने केवळ केंद्र शासनाविराेधात तक्रारी केल्या. महाविकास आघाडी सरकार असते तर ओबीसी आरक्षण मिळालेच नसते.यामुळे त्यांनी याबाबतचे काेणतेही श्रेय घेवू नये.दरम्यान राज्यमंत्री मंडळाचा विस्ताराचा अधिकारी मुख्यमंत्री शिंदे यांना असून ते याबाबत लवकरच निर्णय घेतील.पुर ओसरल्यानंतर १५ दिवसांनी अजित पवार कसले दाैरे करतात असे सवालही बावनकूळे यांनी उपस्थित केले. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित हाेते.

भुजबळांशी चर्चा करण्याची तयारी

समता परिषदेच्या नावाखाली ओबीसी बांधवाची भुजबळ,विजय वडेट्टीवार यांनी फसवणूक केली आहे.गेल्या अडीच वर्षांत सॉलिसिटर जनरलची भुजबळांनी भेट तरी घेतली का असा सवाल उपस्थित केला. ओबीसी आरक्षणाबाबत कधीही व नाशिकमधील काेणत्याची चाैकात भुजबळांसमाेर चर्चा करण्यास तयार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

राऊत यांची साथ साेडावी

शिवेसेनेत निर्माण झालेले वाद व सत्तागेल्यामागे करणे कारण खासदार संजय राऊत आहेे. शिवसेनेत निर्माण झालेले बंड लक्षात घेता आतातरी तरी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची साथ साेडावी असेही यावेळी बावनकुळे असाही टाेला लगावला.

बातम्या आणखी आहेत...